1 Samuel 14:36 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तो म्हणाला, “आज रात्री आपण पलिष्ट्यांवर हल्ला करु. त्यांचे सर्व हिरावून घेऊन त्या सर्वाना कापून काढू.” सर्व सैन्याने त्याच्या म्हणण्याला साथ दिली. पण याजक म्हणाला, “आपण परमेश्वराचा कौल मागू.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शौल म्हणाला, “आपण आज रात्री पलिष्ट्यांचा पाठलाग करून सकाळपर्यंत त्यांना लुटू; त्यांतला एक मनुष्यही सोडता कामा नये.” ते म्हणाले, “आपणाला बरे वाटेल तसे करा.” त्या वेळी याजकाने म्हटले, “चला, आपण येथे देवासमीप जाऊ.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शौल म्हणाला, “चला, आपण रात्री खाली जाऊन पलिष्ट्यांचा पहाटेपर्यंत पाठलाग करू आणि त्यांच्यातील एकालाही जिवंत सोडू नये.” लोक म्हणाले, “तुला जे उत्तम वाटेल ते कर.” परंतु याजकाने म्हटले, “याबाबत आपण परमेश्वराला विचारू.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग शौल बोलला, “आपण रात्री पलिष्ट्यांच्यामागे खाली जाऊन उद्या उजाडेपर्यंत त्याच्यांतली लूट घेऊ आणि आपण त्यांच्यातील एकही पुरुष राहू देऊ नये.” ते म्हणाले, “जे तुला बरे वाटेल ते कर.” मग याजकाने म्हटले आपण येथे परमेश्वराजवळ येऊ.