1 Samuel 14:4 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
खिंडीच्या दोन्ही बाजूला मोठमोठे सुळके होते. योनाथानने त्यांच्या मधून पलिष्ट्यांच्या ठाण्यावर जायचे ठरवले. एका सुळक्याचे नाव बोसेस व दुसऱ्याचे सेने असे होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ज्या घाटांनी योनाथान पलिष्ट्यांच्या छावणीकडे जाऊ पाहत होता त्यांच्या एका बाजूला एक व दुसर्‍या बाजूला एक असे दोन सुळके होते; एका सुळक्याचे नाव बोसेस व दुसर्‍याचे नाव सेने असे होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ज्या घाटांनी योनाथानने पलिष्ट्यांच्या चौकीवर जाण्याची योजना केली होती त्याच्या दोन्ही बाजूंनी शिखरे होती; एका शिखराचे नाव बोसेस व दुसर्‍याचे नाव सेनेह होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
योनाथान ज्या घाटांनी पलिष्ट्यांच्या ठाण्यावर जाण्यास पाहत होता त्याच्या एका बाजूला खडकाळ शिखर व दुसऱ्या बाजूला खडकाळ शिखर होते; त्यातल्या एकाचे नांव बोसेस व दुसऱ्याचे नांव सेने असे होते.