1 Samuel 14:40 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग शौल सर्व इस्राएलांना म्हणाला, “तुम्ही सर्व एका बाजूला उभे राहा. मी आणि माझा मुलगा योनाथान दुसऱ्या बाजूला होतो.” सर्वानी ते मानले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग त्याने इस्राएल लोकांना सांगितले, “तुम्ही एका बाजूला व्हा आणि मी व माझा पुत्र योनाथान दुसर्या बाजूला होऊ.” लोकांनी शौलाला म्हटले, “आपणाला बरे वाटेल तसे करा.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा शौल सर्व इस्राएली लोकांना म्हणाला, “तुम्ही एका बाजूला उभे राहा; मी व माझा पुत्र योनाथान या बाजूला उभे राहतो.” लोक म्हणाले, “तुला जे उत्तम वाटेल ते कर.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग त्याने सर्व इस्राएलांस म्हटले, “तुम्ही एका बाजूला व्हा आणि मी व माझा मुलगा योनाथान दुसऱ्या बाजूला होऊ.” लोक तर शौलाला म्हणाले, “तुला बरे वाटेल ते कर.”