1 Samuel 14:41 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग शौलाने प्रार्थना केली, “इस्राएलच्या परमेश्वरा, देवा, आज तू माझी प्रार्थना का ऐकली नाहीस? मी किंवा माझा मुलगा योनाथान याच्या हातून पाप घडले असेल तर उरीम टाक आणि लोकांच्या हातून पाप घडले असेल तर थुम्मीम टाक” शौल आणि योनाथानच्या नावाने दान पडले आणि लोक सुटले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शौल इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याला म्हणाला, “खरे काय ते आम्हांला दाखवून दे.” तेव्हा योनाथान व शौल ह्यांच्या नावाची चिठ्ठी निघाली आणि लोक सुटले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शौलाने याहवेह इस्राएलाच्या परमेश्वराकडे प्रार्थना केली, “तुम्ही आपल्या सेवकाला आज उत्तर का दिले नाही? जर मी किंवा माझा पुत्र योनाथान दोषी आहे तर उरीमद्वारे ते दाखवावे, परंतु जर इस्राएलचे लोक दोषी आहेत, तर थुम्मीमद्वारे ते दाखवावे.” योनाथान व शौलाची चिठ्ठी निघाली आणि लोक त्यातून सुटले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग शौल परमेश्वर इस्राएलाचा देव, यास म्हणाला, “खरे ते दाखीव.” तेव्हा योनाथान व शौल धरले गेले आणि लोक सुटले.