1 Samuel 14:45 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पण सर्व सैनिक शौलला म्हणाल, “योनाथानने आज इस्राएलकडे विजय खेचून आणला आहे. तेव्हा त्याने मेलेच पाहिजे का? खचितच नाही. आम्ही परमेश्वरापुढे शपथ घेऊन सांगतो की त्याच्या केसालाही धक्का लागणार नाही. पलिष्ट्यांविरुद्ध लढायला परमेश्वराने योनाथानला मदत केली आहे.” अशाप्रकारे लोकांनी योनाथानला वाचवले. त्याला मृत्यूची सजा झाली नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा लोक शौलाला म्हणाले, “ज्याने इस्राएलाचा एवढा उद्धार केला तो योनाथान मरणार काय? असे कदापि होणे नाही; परमेश्वराच्या जीविताची शपथ, त्याच्या डोक्यावरचा एक केसही भूमीवर पडता कामा नये, कारण त्याने आज परमेश्वराच्या पक्षाने कामगिरी केली आहे.” ह्या प्रकारे लोकांनी योनाथानाचा बचाव केला, तो मेला नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु सैनिकांनी शौलाला म्हटले, “ज्याने इस्राएली लोकांस हा मोठा उद्धार आणला आहे, तो योनाथान मरावा काय? कदापि नाही! जिवंत याहवेहची शपथ, त्याच्या डोक्यावरील एक केसही खाली पडणार नाही, कारण त्याने आज जे केले ते परमेश्वराच्या साहाय्याने केले आहे.” याप्रकारे लोकांनी योनाथानला सोडविले आणि त्याला मृत्युदंड दिला नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग लोक शौलाला म्हणाले, “ज्याने इस्राएलाचे हे मोठे तारण केले तो योनाथान मरावा काय? ते तर दूरच असो! परमेश्वर जिवंत आहे. याच्या डोक्याचा एक केसही भूमीवर पडणार नाही. कारण याने परमेश्वराच्याबरोबर काम केले आहे.” या प्रकारे लोकांनी योनाथानाला सोडवले म्हणून तो मेला नाही.