1 Samuel 14:52 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
शौलने आयुष्यभर पराक्रम गाजवले. पलिष्ट्यांचा त्याने कडवा प्रतिकार केला. त्याला कुठेही शूर, पराक्रमी माणूस आढळला की त्याला तो सैनिकात भरती करुन घेई आणि अंगरक्षक म्हणून नेमी.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शौलाची आयुष्यभर पलिष्ट्यांशी बिकट लढाई चालू राहिली; ह्यास्तव शौलाला कोणी पराक्रमी अथवा शूर पुरुष आढळला तर तो त्याला आपल्या पदरी ठेवून घेई.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शौलाच्या सर्व कारकिर्दीत इस्राएल व पलिष्ट्यांमध्ये घनघोर युद्ध होते, आणि जेव्हा शौलाला एखादा पराक्रमी किंवा शूर पुरुष आढळला तर तो त्याला आपल्या सेवेत सामील करीत असे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शौलाच्या सर्व दिवसात पलिष्ट्यांशी जबर लढाई चालू होती. शौल कोणी बलवान किंवा कोणी शूर मनुष्य पाही, तेव्हा तो त्यास आपल्याजवळ ठेवून घेई.