1 Samuel 15:17 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
शमुवेल सांगायला लागला, “पूर्वी तू स्वत:ला मोठा समजत नव्हतास. पण तू सर्व इस्राएलांचा प्रमुख बनलास. परमेश्वराने तुला राजा म्हणून नेमले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शमुवेल म्हणाला, “तू आपल्या दृष्टीने क्षुद्र होतास तरी तुला इस्राएली कुळांचा नायक केले ना? आणि तू इस्राएलाचा राजा व्हावे म्हणून परमेश्वराने तुला अभिषेक केला ना?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शमुवेल म्हणाले, “एकेकाळी तू आपल्याच दृष्टीने लहान होतास, तरी इस्राएलच्या गोत्रांचा पुढारी तू झाला नाहीस काय? याहवेहने तुला इस्राएलचा राजा म्हणून अभिषेक केला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग शमुवेल म्हणाला, “तू आपल्या दृष्टीने लहान होतास तेव्हा तुला इस्राएलाच्या वंशांचा मुख्य करण्यात आले नाही काय? आणि परमेश्वराने तुला इस्राएलावर राजा केले”