1 Samuel 16:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
इशायने मग कोणालातरी पाठवून आपल्या धाकट्या मुलाला यायला सांगितले. तो अतिशय देखणा, तांबूस वर्णाचा तरुण होता. परमेश्वर आता शमुवेलला म्हणाला, “ऊठ आणि याला अभिषेक कर. हाच तो.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने बोलावणे पाठवून त्याला आणले. त्याचा वर्ण तांबूस, डोळे सुंदर व रूप मनोहर होते. तेव्हा परमेश्वराने त्याला म्हटले, “ऊठ, त्याला अभिषेक कर, हाच तो आहे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा इशायाने त्याला बोलावून आणले. तो तांबूस रंगाचा, सुंदर डोळ्यांचा, दिसायला देखणा असा होता. तेव्हा याहवेह म्हणाले, “ऊठ आणि त्याला अभिषिक्त कर, हाच तो आहे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग त्याने त्यास बोलावून आणले तो तांबूस रंगाचा आणि सुंदर डोळ्यांचा होता आणि त्याचे रुप मनोहर होते. तेव्हा परमेश्वराने त्यास म्हटले, “उठून ह्याला अभिषेक कर; कारण हाच तो आहे.”