1 Samuel 16:2 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा शमुवेल म्हणाला, “मी कसा जाऊ? ही गोष्ट शौलने ऐकली तर तो माझा जीव घ्यायचा प्रयत्न करील.” परमेश्वर त्यावर त्याला म्हणाला, “तू बेथलहेमला जायला नीघ, बरोबर एक वासरु घे. “मी परमेश्वराला यज्ञ कायला चाललो आहे” असे म्हण.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शमुवेल म्हणाला, “मी जाऊ कसा? शौलाने हे ऐकले तर तो मला जिवे मारील.” तेव्हा परमेश्वर म्हणाला, “तू आपल्याबरोबर एक कालवड घेऊन जा आणि सांग की, ‘मी परमेश्वराप्रीत्यर्थ यज्ञ करायला आलो आहे.’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु शमुवेल म्हणाला, “मी कसे जाऊ? जर शौलाने याविषयी ऐकले, तर तो मला जिवे मारेल.” याहवेह म्हणाले, “तुझ्यासोबत एक कालवड घे आणि सांग, ‘मी याहवेहला यज्ञ करण्यासाठी आलो आहे.’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा शमुवेल म्हणाला, “मी कसा जाऊ? जर शौल ऐकेल तर तो मला जीवे मारील.” मग परमेश्वर म्हणाला, “एक कालवड आपल्याबरोबर घे आणि मी देवाकडे यज्ञ करण्यास आलो आहे असे म्हण.