1 Samuel 16:23 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग जेव्हा जेव्हा शौल दुरात्म्या मुळे हैराण होई तेव्हा तेव्हा दावीद वीणावादन करी. त्यामुळे दुरात्मा पळून जाऊन शौलला दिलासा मिळे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जेव्हा जेव्हा देवाकडील दुरात्म्याची शौलाला बाधा होई तेव्हा तेव्हा दावीद वीणा घेऊन आपल्या हाताने वाजवीत असे; मग शौलाला चैन पडून बरे वाटत असे, व तो दुरात्मा त्याला सोडून जात असे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ज्या ज्यावेळी परमेश्वराकडून पाठविलेला दुष्ट आत्मा शौलावर येई, त्यावेळी दावीद आपली वीणा घेऊन वाजवित असे, तेव्हा शौलाला बरे वाटत असे, आणि दुष्ट आत्मा शौलाला सोडून जात असे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग जेव्हा केव्हा देवापासून दुष्ट आत्मा शौलावर येत असे, “तेव्हा दावीदाने विणा घेऊन आपल्या हाताने वाजवी. मग शौल शांत होऊन बरा होई, व तो दुष्ट आत्म्या त्यास सोडून जाई.”