1 Samuel 16:4 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
शमुवेलने मग परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे केले. तो बेथलहेम येथे आला. तेव्हा तेथील वडीलधाऱ्यांना धास्ती वाटली. ते शमुवेलला भेटले. “आपली ही सलोख्याचीच भेट आहे ना”, असे त्यांनी शमुवेलला विचारले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे शमुवेलाने केले व तो बेथलेहेमास गेला. तेव्हा त्या नगरातले वडील जन थरथर कापत त्याला भेटायला आले, व त्यांनी त्याला विचारले, “आपण स्नेहभावाने आला आहात काय?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याहवेहने सांगितल्याप्रमाणे शमुवेलने केले. जेव्हा शमुवेल बेथलेहेमला पोहोचला, तेव्हा त्या नगराचे वडीलजन थरथर कापत त्यांना भेटले. त्यांनी विचारले, “आपण शांतीने आला आहात काय?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा परमेश्वराने जे सांगितले ते शमुवेलाने केले आणि मग बेथलेहेमास गेला. नगराचे वडीलजन भीत भीत त्यास भेटायास आले व त्यांनी त्यास विचारले, “तुम्ही शांतीनेच आला आहात ना?”