1 Samuel 16:5 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
शमुवेल म्हणाला, “होय, मी स्नेहभावाने आलो आहे. मला परमेश्वरासाठी यज्ञ करायचा आहे. तयारीला लागा आणि माझ्याबरोबर यज्ञासाठी या.” शमुवेलने इशायला व त्याच्या मुलांना तयार केले. त्यांनाही यज्ञात आमंत्रित करुन त्यात भाग घ्यायला सांगितले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो म्हणाला, “मी स्नेहभावाने आलो आहे; मी परमेश्वराप्रीत्यर्थ यज्ञ करण्यास आलो आहे. तुम्ही शुद्ध होऊन माझ्याबरोबर यज्ञाला या.” त्याने इशाय व त्याचे पुत्र ह्यांना पवित्र होऊन यज्ञाला येण्याचे आमंत्रण दिले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शमुवेलने उत्तर दिले, “होय, मी शांतीने आलो आहे; मी याहवेहला यज्ञ करण्यासाठी आलो आहे. आपणास शुद्ध करा आणि माझ्याबरोबर यज्ञाला या.” मग शमुवेलने इशाय व त्याच्या पुत्रांना शुद्ध केले आणि त्यांना यज्ञासाठी आमंत्रण दिले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याने म्हटले, “शांतीने; मी परमेश्वरास यज्ञ अर्पण करायास आलो आहे. मजबरोबर यज्ञास येण्यासाठी तुम्ही शुद्ध व्हा.” त्याने इशाय व त्याचे पुत्र यांना शुद्ध केल्यावर त्यांना यज्ञास बोलाविले.