1 Samuel 17:20 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
दुसऱ्या दिवशी दावीदाने आपली मेंढरे दुसऱ्या एका मेंढपाळाच्या हाती सोपवली आणि तो इशायच्या म्हणण्याप्रमाणे सर्व सामान घेऊन निघाला. दावीद आपली गाडी घेऊन तळाशी पोचला तेव्हा सर्व सैनिक रणगर्जना करत आपापल्या युध्दव्यूहातल्या जागांवर चालले होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दावीद सकाळीच उठला व शेरडेमेंढरे एका राखणार्‍याच्या हवाली करून इशायाने त्याला सांगितल्याप्रमाणे सर्व वस्तू घेऊन गेला; सेना रणशब्द करीत रणभूमीकडे चालली असता तो सैन्याच्या छावणीजवळ जाऊन पोहचला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सकाळी लवकरच दावीदाने आपली मेंढरे एका राखणदार्‍याच्या हाती सोडली, इशायाने सांगितल्याप्रमाणे सर्वकाही घेऊन निघाला. तो छावणीजवळ पोहोचला, तेव्हा सैन्य युद्धाच्या घोषणा देत त्यांच्या लढाईच्या स्थानी जात होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दावीद पहाटेस उठला आणि एका राखणाऱ्यांकडे मेंढरे सोपवून इशायाने सांगितल्या प्रमाणे सामान घेऊन गेला. तेव्हा सैन्य रणशब्द करून लढण्यास जात असता दावीद सैन्याच्या छावणी जवळ जाऊन पोहोचला.