1 Samuel 17:23 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्याने त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली. तेवढ्यात पलिष्ट्यांचा गथ येथील झूंजार सैनिक गल्याथ आपल्या आव्हात सैन्यातून बाहेर येऊन नेहमी प्रमाणे इस्राएलला आव्हान देऊ लागला. ते सर्व दावीदाने ऐकले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो त्यांच्याबरोबर बोलत असता, पलिष्ट्यांच्या गोटातून तो गथ येथील गल्याथ नावाचा पलिष्टी वीर तेथे चालून येऊन पूर्वोक्त शब्द बोलला ते दाविदाने ऐकले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तो त्यांच्याबरोबर बोलत असता, गथ येथील पलिष्टी महाशूरवीर गल्याथ त्याच्या जागेतून बाहेर येऊन नेहमीप्रमाणे ओरडून बोलला, आणि दावीदाने ते ऐकले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो त्यांच्याशी बोलत असता पाहा तो युद्धवीर पलिष्टी गल्याथ नावाचा गथकर पलिष्ट्यांच्या सैन्यातून निघून मागे म्हटलेले शब्द बोलू लागला आणि ते दावीदाने ऐकले.