1 Samuel 17:25 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्यातला एक इस्राएली म्हणाला, “बघितलंस त्याला? पाहून घे. हा गल्याथ पुन्हा पुन्हा येऊन इस्राएलची निर्भत्सना करतो. जो कोणी त्याला ठार करील त्याला शौल राजा भरपूर द्रव्य देईल. आपल्या मुलीचे त्याच्याशी लग्न लावून देईल. शिवाय इस्राएलमध्ये त्याचे घराणे स्वतंत्र करील.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
इस्राएल लोक म्हणू लागले, “हा चालून आलेला पुरुष तुम्ही पाहिला ना? तो इस्राएलाची निर्भर्त्सना करायला आला आहे; जो कोणी त्याला ठार मारील त्याला राजा बहुत धन देऊन संपन्न करील, आपली कन्या त्याला देईल, आणि इस्राएलात त्याच्या बापाचे घराणे स्वतंत्र करील.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
इस्राएली लोक म्हणत होते, “तुम्ही हा मनुष्य बाहेर येताना पाहता ना? तो इस्राएली लोकांना चेतावणी देण्यासाठी बाहेर येतो. जो कोणी त्याला ठार मारेल त्याला राजा मोठी संपत्ती देईल, तो त्याला त्याची कन्या देईल व इस्राएलात त्याचे कुटुंब करमुक्त होईल.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग इस्राएलाची माणसे म्हणाली, “हा जो मनुष्य पुढे आला आहे त्यास तुम्ही पाहिले काय? तो खरेच इस्राएलाची निंदा करण्यास आला आहे. आणि जो मनुष्य ह्याला जिवे मारील त्यास राजा फार धन देईल आणि आपली कन्या त्यास देईल आणि त्याच्या बापाचे कुटुंब नामांकित करील.”