1 Samuel 18:17 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
शौल मात्र दावीदाच्या जिवावर उठला होता. त्याला पेचात पकडण्यासाठी शौलने एक योजना आखली. तो दावीदला म्हणाला, “ही मेरब माझी मोठी मुलगी. तू हवे तर हिच्यशी लग्न्न कर. मग तू आणखीच सामर्थ्यवान होसील. तू माझ्या मुलासारखाच होशील. मग तू परमेश्वराच्या वतीने लढाया कर.” ही एक युक्ती होती. प्रत्यक्षात शौलचा विचार वेगळाच होता. ‘आता मला त्याचा जीव घ्यायला नको. परस्पर पलिष्टीच त्याचा काटा काढतील’ असा त्याचा बेत होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शौल दाविदाला म्हणाला, “पाहा, माझी वडील कन्या मेरब हिच्याशी तुझे लग्न करून देतो; मात्र तुझा पराक्रम माझ्यासाठी होऊ दे, आणि परमेश्वराच्या वतीने लढाया कर.” आपला हात त्याच्यावर पडू नये तर पलिष्ट्यांचा हात त्याच्यावर पडावा असे त्याला वाटत होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एके दिवशी शौल दावीदास म्हणाला, “माझी थोरली कन्या मेरब तुला मी पत्नी म्हणून देईन, केवळ शौर्याने माझी सेवा कर व याहवेहच्या लढाया लढ.” कारण शौल स्वतःशी म्हणाला, “मी दावीदावर हात टाकणार नाही, पलिष्ट्यांनी ते करावे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग शौलाने दावीदाले म्हटले, “पाहा मी आपली वडील कन्या मेरब ही तुला पत्नी करून देईन. माझ्यासाठी तू केवळ शूर हो, आणि परमेश्वरासाठी लढाया कर.” कारण शौल म्हणाला, माझा हात त्याजवर न पडो, पण पलिष्टंयाचा हात त्याजवर पडो.