1 Samuel 18:20 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
शौलची दुसरी मलुगी मीखल हिचे दावीदवर प्रेम होते. लोकांनी ही गोष्ट शौलच्या कानावर घातली. तेव्हा त्याला फारच आनंद झाला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शौलाची कन्या मीखल हिचे दाविदावर प्रेम जडले; लोकांनी हे शौलाला कळवले, तेव्हा त्याला ते पसंत पडले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
या दरम्यान शौलाची कन्या मीखल हिचे दावीदावर प्रेम जडले, हे ऐकून शौलाला आनंद झाला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा शौलाची कन्या मीखल ही दावीदावर प्रीती करीत असे, आणि हे शौलाला सांगितले असता त्यास बरे वाटले.