1 Samuel 18:22 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
शौलने आपल्या अधिकाऱ्यांना आज्ञा दिल्या. त्यांना तो म्हणाला, “त्याला विश्वासात घेऊन हळूच सांगा, ‘राजाला तू आवडतोस. तू त्याच्या अधिकाऱ्यांच्या मर्जीतला आहेस. तेव्हा राजाच्या मुलीशी तू लग्न्न कर.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शौलाने आपल्या सेवकांना आज्ञा केली की, “दाविदाला आतून असे म्हणा की ’राजा तुझ्यावर प्रसन्न आहे; त्याचे सर्व सेवक तुझ्यावर प्रेम करतात, तर आता तू राजाचा जावई हो.”’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा शौलाने आपल्या सेवकांना आज्ञा दिली: “दावीदाशी गुप्तपणे बोलून सांगा की राजाला तू आवडतोस आणि त्याच्या सर्व सेवकांची तुझ्यावर प्रीती आहे; म्हणून राजाचा जावई हो.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शौलाने आपल्या चाकरास आज्ञा केली की, “तुम्ही दावीदाला गुप्तपणे बोलून म्हणा, की पाहा राजा तुजवर संतुष्ट आहे आणि त्याचे अवघे चाकर तुजवर प्रीती करतात. तर आता राजाचा जावई हो.”