1 Samuel 18:23 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
शौलच्या अधिकाऱ्यांनी दावीदला हे सर्व सांगितले. पण तो म्हणाला, “राजाचा जावई होणं सोपं आहे अस तुम्हाला वाटतं का? मी सामान्य, निर्धन माणूस, तिच्यासाठी खर्च कुठून करणार?”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शौलाच्या सेवकांनी दाविदाच्या कानावर हे घातले तेव्हा तो म्हणाला, “मी केवळ निर्धन व तुच्छ असा मनुष्य आहे; राजाचा जावई होणे ही तुमच्या दृष्टीने हलकी गोष्ट आहे काय?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे शब्द शौलाच्या सेवकांनी दावीदाला सांगितले. परंतु दावीद म्हणाला, “मी केवळ एक गरीब व अप्रसिद्ध मनुष्य आहे, राजाचा जावई होणे तुम्हाला फार हलकी गोष्ट वाटते काय?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शौलाच्या चाकरांनी हे शब्द दावीदाला सांगितले. तेव्हा दावीदाने म्हटले की, “राजाचा जावई होणे ही तुमच्या हिशोबात हलकी गोष्ट आहे की काय?” मी तर दीन व तुच्छ असा मनुष्य आहे.