1 Samuel 18:6 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
दावीद पलिष्ट्यांचा सामना करायला लढाईवर जाई तेव्हा मुक्कामावर परतताना इस्राएलमधल्या सर्व गावातल्या स्त्रिया त्याच्या स्वागताला समोर येत. त्या आनंदाने गात नाचत. डफ, वीणा वाजवत. शौलच्या समोरच हे चाले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्या पलिष्ट्याचा वध करून दावीद परतल्यावर लोक माघारी येत असता इस्राएलाच्या सर्व नगरांतून स्त्रिया बाहेर निघाल्या आणि डफ व झांजा वाजवून मोठ्या आनंदाने गात व नाचत शौल राजाला सामोर्या आल्या.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दावीदाने पलिष्टी गल्याथाला ठार मारल्यानंतर ज्यावेळी लोक परत घरी येत होते, त्यावेळी इस्राएलच्या सर्व नगरांतून प्रत्येक गावातून स्त्रिया गात व नाचत आणि हर्षाने डफ व झांजा वाजवित शौल राजाला भेटायला आल्या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग असे झाले की, ते त्या पलिष्ट्याला मारून माघारी आले, तेव्हा स्त्रिया इस्राएलच्या सर्व नगरातून गात व नाचत, डफ व झांज वाजवीत शौल राजाची भेट घ्यावयास निघाल्या.