1 Samuel 19:11 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
शौलाने काही जणांना दावीदाच्या घरी पाठवले. त्यांनी त्याच्या घरावर पहारा दिला. रात्रभर ते बसून राहिले. सकाळी त्याला मारावे असा त्यांचा बेत होता. पण दावीदाच्या बायकोने, मीखलने. दावीदाला सावध केले. तिने त्याला रातोरात पळून जाऊन जीव वाचवायला सांगितले, नाही तर उद्या तुझा खून होईल असे ती त्याला म्हणाली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दाविदाच्या घरावर पहारा ठेवून सकाळी त्याला मारून टाकावे म्हणून शौलाने तिकडे जासूद पाठवले; तेव्हा दाविदाची बायको मीखल हिने त्याला सांगितले, “आज रात्री आपण आपल्या जिवाचा बचाव करणार नाही तर उद्या ठार व्हाल.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शौलाने दावीदाच्या घरावर पहारा ठेवून सकाळी त्याला मारावे म्हणून माणसे पाठवली. परंतु दावीदाची पत्नी मीखल हिने त्याला सावध केले, “जर आज रात्री तू आपला जीव वाचवण्यासाठी पळ काढला नाही तर उद्या सकाळी तू मारला जाशील.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग दावीदावर टपून सकाळी त्यास जिवे मारावे म्हणून शौलाने त्याच्या घरास दूत पाठविले आणि दावीदाची पत्नी हे वर्तमान त्यास सांगून असे बोलली की, “जर आज रात्री आपल्या जिवाचे रक्षण तुम्ही करणार नाही, तर सकाळी तुम्ही जिवे मारले जाल.”