1 Samuel 19:17 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
शौल मीखलला म्हणाला, “तू मला असे का फसवलेस? तू माझ्या शत्रूला दाविदला पळून जायला मदत केलीस.” मीखल म्हणाली, “मी त्याला पळून जायला मदत केली नाही तर तो माझा जीव घेईल असे म्हणाला.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शौल मीखलला म्हणाला, “तू मला असे का फसवलेस? तू माझ्या शत्रूला पळू देऊन त्याला आपला बचाव का करू दिलास?” मीखल शौलाला म्हणाली, “त्याने मला म्हटले की मला जाऊ दे, माझ्या हातून तू का मरतेस?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शौल मीखलला म्हणाला, “तू मला असे का फसविलेस आणि त्याने पळून जावे म्हणून तू माझ्या शत्रूला का जाऊ दिलेस?” मीखल त्याला म्हणाली, “मला तो म्हणाला, ‘मला जाऊ दे, मी तुला का मारावे?’ ”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा शौलाने मीखलला म्हटले की, “तू मला का फसविले आणि माझ्या वैऱ्याने निभावून पळून जावे म्हणून त्यास का पाठवून दिले?” मग मीखल शौलाला म्हणाली, “त्याने मला म्हटले की मला जाऊ दे, मी तुला का मारावे?”