1 Samuel 19:18 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
दावीद जो पळाला तो रामा येथे शमुवेलकडे गेला. शमुवेलला त्याने शौलने जे जे केले ते सर्व सांगितले. मग शमुवेल आणि दावीद संदेष्ट्यांच्या राहण्याच्या ठिकाणी गेले. दावीद तेथे राहिला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दावीद पळून निभावून रामास शमुवेलाकडे गेला व जे काही वर्तन शौलाने त्याच्याशी केले ते अवघे त्याने त्याच्या कानी घातले. मग तो व शमुवेल नायोथ येथे जाऊन राहिले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा दावीद निसटून पळाला तेव्हा तो रामाह येथे शमुवेलकडे गेला आणि शौलाने त्याच्याशी केले ते सर्वकाही त्यांना सांगितले. मग तो व शमुवेल नायोथ येथे जाऊन राहिले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
याप्रमाणे दावीदाने पळून जाऊन आपल्या जिवाचे रक्षण केले. आणि शमुवेलाजवळ रामामध्ये येऊन त्याने आपणाला शौलाने जे सगळे केले होते ते सांगितले; तेव्हा तो व शमुवेल जाऊन नायोथात राहिले.