1 Samuel 19:22 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
शेवटी शौल स्वत:च रामा येथे आला. सेखू येथील खळड्या जवळच्या मोठ्या विहिरीशी तो आला तेव्हा त्याने शमुवेल आणि दावीदाचा ठावठिकाणा विचारला. लोक म्हणाले, “ते रामाजवळच्या तळावर आहेत.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग तो स्वत: रामास गेला, व सेखूतल्या मोठ्या हौदानजीक येऊन पोहचल्यावर विचारू लागला, “शमुवेल व दावीद कोठे आहेत?” तेव्हा कोणी सांगितले, “पाहा, ते रामातील नायोथ येथे आहेत.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शेवटी, शौल स्वतः रामाहास निघाला व सेखू येथील मोठ्या विहिरीपर्यंत पोहोचल्यावर, त्याने विचारले, “दावीद व शमुवेल कुठे आहेत?” ते म्हणाले, “रामाहतील नायोथ येथे ते गेले आहेत.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा तो सुद्धा रामास जायास निघाला आणि सेखूमध्ये एका मोठ्या विहीरीजवळ येऊन त्याने असे विचारिले की, “शमुवेल व दावीद कोठे आहेत?” मग कोणी एकाने म्हटले, “पाहा ते रामातल्या नायोथात आहेत.”