1 Samuel 19:9 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण शौलवर परमेश्वराच्या दुष्ट आत्म्याचा संचार झाला. शौल आपल्या घरात बसला होता. त्याच्या हातात भाला होता. दावीद वीणा वाजवत होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शौल हाती भाला घेऊन आपल्या मंदिरात बसला असून दावीद त्याच्यापुढे वाद्य वाजवत असता परमेश्वराकडील दुरात्मा शौलाच्या ठायी संचरला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु शौल आपल्या घरी हातात भाला घेऊन बसला असता दावीद त्याच्यापुढे वीणा वाजवित होता, तेव्हा याहवेहकडून पाठविलेला एक दुष्ट आत्मा शौलावर आला,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग परमेश्वराचा पासून दुष्ट आत्मा शौलावर आला आणि तो आपला भाला हाती धरुन आपल्या घरी बसला असता दावीद हाताने वाद्य वाजवीत होता.