1 Samuel 2:1 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
हन्नाने परमेश्वराला धन्यवाद देणारे गीत म्हटले; “परमेश्वराबद्दल माझ्या मनात आनंद मावत नाही. त्याच्यामुळे मला सामर्थ्य आले माझ्या शत्रुंना मी हसते. माझ्या विजयाचा मला आनंद आहे!
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हन्ना हिने प्रार्थना केली ती ही: “परमेश्वराच्या ठायी माझे हृदय उल्लासत आहे; परमेश्वराच्या ठायी माझा उत्कर्ष झाला आहे; माझे मुख माझ्या शत्रूंविरुद्ध उघडले आहे. कारण तू केलेल्या उद्धाराने मला आनंद होत आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा हन्नाहने प्रार्थना केली आणि म्हणाली: “माझे हृदय याहवेहमध्ये आनंद करीत आहे; याहवेहमध्ये माझे शिंग उंच केलेले आहे. माझे मुख माझ्या शत्रूंपुढे बढाई मारते, कारण याहवेहने दिलेल्या उद्धारात मी आनंद करते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग हन्ना प्रार्थना करून म्हणाली, “माझे मन परमेश्वराच्या ठायी आनंद पावत आहे; माझे शिंग परमेश्वराच्या ठायी उंच केले आहे; माझे मुख माझ्या शत्रूविरूद्ध धैर्याने बोलत आहे, कारण तू केलेल्या तारणाने मी आनंदीत होत आहे.