1 Samuel 2:10 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
शत्रूंचा तो नाश करुन त्याच्यावर गर्जेल. दूरदूरच्या प्रदेशांचाही तो न्याय करील. राजाला सामर्थ्य देईल. आपल्या खास राजाला बलवान करील.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परमेश्वराशी झगडणार्‍यांचा चुराडा होईल. तो त्यांच्यावर आकाशातून गर्जेल; परमेश्वर पृथ्वीच्या दिगंतापर्यंत न्याय करील; तो आपल्या राजाला बल देईल, तो आपल्या अभिषिक्ताचा उत्कर्ष करील.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जे याहवेहचा विरोध करतात त्यांचा चुराडा होईल. सर्वश्रेष्ठ याहवेह स्वर्गातून गर्जना करतील; पृथ्वीच्या शेवटचा न्याय याहवेह करतील. “ते आपल्या राजाला सामर्थ्य देतील, आणि आपल्या अभिषिक्ताचे शिंग उंच करतील.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
देवाशी विरोध करणाऱ्यांचे तुकडे तुकडे केले जातील; आकाशांतून तो त्यांच्याविरुध्द मेघगर्जना करील. परमेश्वर पृथ्वीच्या शेवटल्या टोकावर असलेल्यांचा न्याय करील; तो आपल्या राजाला सामर्थ्य देईल आणि आपल्या अभिषिक्ताचे शिंग उंच करील.”