1 Samuel 2:13 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
याजकांनी लोकांना जशी वागणूक द्यावी तशी ते देत नव्हते. खरी रीत अशी होती की लोकांनी यज्ञासाठी बळी आणल्यावर याजकांनी ते मांस शिजत ठेवायचे. याजकाच्या नोकराने तीन काटे असलेली आकडी आणायची.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
लोकांसंबंधाने याजकांची वहिवाट अशी होती की कोणी मनुष्य होमबली अर्पण करायला आला तर मांस शिजत असता याजकाचा चाकर हाती त्रिशूळ घेऊन तेथे येई,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याजकांची अशी रीत होती की, ज्यावेळेस लोकांमधील कोणी यज्ञार्पण केले व जेव्हा ते मांस शिजविले जात असे, तेव्हा याजकांचा सेवक तीन टोके असलेला काटा घेऊन येत असे
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
लोकांच्या बाबतीत याजकांची अशी रीत होती की कोणी मनुष्य यज्ञ अर्पण करू लागला की, मांस शिजत असतानाच याजकाचा चाकर मांस उचलण्यासाठी तीन अणकुचीदार टोकाचा काटा आपल्या हातात घेऊन येई