1 Samuel 2:14 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तपेल्यात तो त्रिशूल खुपसून त्यावर येईल तेवढेच मांस याजकाने स्वीकारायचे. शिलो येथे यज्ञासाठी येणाऱ्या सर्व इस्राएलीच्या बाबतीत याजकांनी असेच करायला हवे होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि परातीत, गंगाळात, कढईत अथवा तपेल्यात त्रिशूळ मारून जितके मांस त्याला लागे तितके याजक स्वतःसाठी घेई. शिलो येथे जे इस्राएल लोक येत त्यांच्याशी ते असाच व्यवहार करत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि परातीत किंवा पातेल्यात किंवा कढईत किंवा गंगाळात तो काटा टाकून जितके मांस त्या काट्याने वरती येईल याजक ते आपल्या स्वतःसाठी घेत असे, शिलोह येथे आलेल्या सर्व इस्राएल लोकांशी ते असाच व्यवहार करीत असत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो परातीत किंवा पातेल्यांत किंवा कढईत किंवा गंगाळात तो काटा घुसवत असे आणि तो काटा जे सर्व धरून काढी, ते याजक आपणासाठी घेई. जे इस्राएली लोक शिलो येथे येत त्या सर्वांना ते तसेच करत असत