1 Samuel 2:25 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
एका माणसाने दुसऱ्या माणसाचा काही अपराध केला तर परमेश्वर एकवेळ त्याच्या मदतीला येईल. पण परमेश्वराविरुध्दच पातक केले तर त्याच्या मदतीला कोण धावून येणार?” पण एलीच्या मुलांनी वडिलांच्या सांगण्याकडे साफ दुर्लक्ष केले. तेव्हा परमेश्वराने या मुलांना मारायचे ठरवले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कोणा मनुष्याने दुसर्‍या मनुष्याचा अपराध केला तर न्यायाधीश त्याचा न्याय करील, पण कोणी परमेश्वराविरुद्ध पातक केले तर त्याची वकिली कोण करील?” तरीपण ते आपल्या पित्याचा शब्द ऐकेनात कारण देवाला त्यांना मारून टाकायचे होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जर एक व्यक्ती दुसर्‍याविरुद्ध पाप करते, तर परमेश्वर त्या अपराध्यासाठी मध्यस्थी करतील; परंतु जर कोणी याहवेहविरुद्ध पाप केले तर त्यांच्यासाठी कोण मध्यस्थी करेल?” तरीही त्याच्या मुलांनी त्यांच्या वडिलांच्या निषेधाकडे लक्ष दिले नाही, कारण त्यांना जिवे मारावे अशी याहवेहची इच्छा होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जर कोणी एक पुरुष दुसऱ्याविरूद्ध पाप करील तर परमेश्वर त्याचा न्याय करील. पण जर पुरुष परमेश्वराच्या विरूद्ध पाप करील तर त्यासाठी कोण मध्यस्थी करेल?” पण ते आपल्या बापाचे शब्द ऐकेनात कारण त्यांना जिवे मारावे असा देवाचा हेतू होता.