1 Samuel 2:36 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग तुझ्या घरातील उरले सुरले लोक येऊन या याजकापुढे नतमस्तक होतील. किरकोळ रक्कम किंवा भाकरतुकडा याच्यासाठी ते पदर पसरतील आणि म्हणतील, “माझ्या भाकरीची सोय व्हावी म्हणून याजकपदातील एखादे काम मला द्या.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुझ्या घराण्यातला जो कोणी वाचून राहील तो चवलीपावलीसाठी व कोरभर भाकरीसाठी त्याच्याकडे जाऊन त्याला दंडवत घालील व म्हणेल की याजकपणाचे कोणतेतरी काम मला द्या म्हणजे मला घासभर अन्न मिळेल.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नंतर तुझ्या घराण्यातील राहिलेला प्रत्येकजण येईल आणि चांदीच्या तुकड्यासाठी आणि भाकरीच्या तुकड्यासाठी त्याच्यासमोर वाकतील आणि विनंती करतील, “मला खाण्यासाठी अन्न असावे म्हणून माझ्यासाठी काही याजकीय पद द्या.” ’ ”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
असे होईल की तुझ्या घराण्यातील प्रत्येक जण जो कोणी राहिलेला आहे तो येऊन रुप्याच्या तुकड्यासाठी व भाकरीच्या तुकड्यासाठी त्याच्यापुढे नमन करील आणि म्हणेल की, मी तुला विनंती करतो मला भाकरीचा तुकडा खाण्यास मिळावा म्हणून मला याजकपदातले एखादे काम दे.”