1 Samuel 2:5 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पूर्वी ज्यांच्याकडे अन्नाधान्याचे मुबलक साठे होते त्यांना आज अन्नासाठी मोल मजुरी करावी लागत आहे. आणि जे पूर्वी भुकेकंगाल होते ते आता आराम करत आहेत. आजपर्यंत नि:संतान होती तिला आता सात मुलं आहेत. पण मुलबाळ असलेली दु:खी आहे. कारण तिची मुलं तिच्यापासून लांब गेली आहेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जे पोटभर खात होते ते अन्नासाठी मोलमजुरी करत आहेत. जे क्षुधित होते त्यांना आता आराम प्राप्त झाला आहे; वंध्येला सात मुले झाली आहेत; बहुपुत्रवती क्षीण झाली आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ज्यांच्याकडे भरपूर होते ते आता अन्नासाठी मजुरी करीत आहेत, परंतु जे भुकेले होते ते आता भुकेले नाहीत. जी अपत्यहीन होती तिने सात लेकरांना जन्म दिला आहे, परंतु जिला अनेक मुले होती ती क्षीण झाली आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जे तृप्त होते ते अन्नासाठी मोलमजुरी करीत आहेत; आणि जे भुकेले होते ते तसे राहिले नाहीत. वांझ होती तिने सात मुलांस जन्म दिला आहे, परंतु फार लेकरे आहेत ती अशक्त झाली आहे.