1 Samuel 2:9 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
सज्जनांना तो आधार देतो. त्यांना लटपटू देत नाही. पण दुर्जनांचा संहार करतो. त्यांना गर्तेत ढकलतो दुर्जनांचे बळ अशा वेळी कुचकामी ठरते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो आपल्या भक्तांची पावले सांभाळील. पण दुष्ट अंधारात स्तब्ध पडून राहतील; कारण कोणीही मानव आपल्याच बलाने विजयी होणार नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते आपल्या प्रामाणिक सेवकांची पावले सांभाळतील, परंतु दुष्ट अंधकारमय ठिकाणी शांत केले जातील. “कोणीही बळाने विजय पावत नाही;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो आपल्या विश्वास ठेवणाऱ्या लोकांचे पाय संभाळील, परंतु दुष्ट अंधारात शांत ठिकाणी ठेवले जातील, कारण सामर्थ्याने कोणी मनुष्य विजय मिळविणार नाही.