1 Samuel 20:27 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
दुसऱ्या दिवशी पुन्हा दावीदाचे आसन रिकामेच राहिले. तेव्हा मात्र शौल योनाथानला म्हणाला, “इशायचा मुलगा या प्रंसगी दिसत नाही. कालही नव्हता, आजही नाही. असे का?”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
चंद्रदर्शनाच्या दुसर्या दिवशीही दाविदाची जागा रिकामीच होती; तेव्हा शौल आपला पुत्र योनाथान ह्याला म्हणाला, “इशायपुत्र काल व आज भोजनास का आला नाही?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु दुसर्या दिवशी, त्या महिन्याच्या दुसर्या दिवशी दावीदाचे स्थान पुन्हा रिकामे होते. तेव्हा शौलाने त्यांचा पुत्र योनाथान याला विचारले, “इशायाचा पुत्र काल आणि आजही भोजनास का आला नाही?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग चंद्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी असे झाले की, दावीदाची जागा रिकामी होती आणि शौलाने आपला मुलगा योनाथानाला म्हटले, “इशायाचा मुलगा काल व आजही जेवायला का आला नाही.”