1 Samuel 20:36 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्याला तो म्हणाला, “धावत पुढे हो. मी बाण मारतो तो आण.” मुलगा धावत जायला लागल्यावर योनाथानने त्याच्या डोक्यावरुन बाण मारले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो आपल्या पोराला म्हणाला, “मी बाण सोडतो ते शोधून आण. तो पोरगा धावू लागला तेव्हा त्याने त्याच्या पलीकडे जाईल असा एक बाण सोडला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि तो त्या मुलाला म्हणाला, “मी बाण मारतो, तू पळत जाऊन ते बाण शोध.” तो मुलगा पळू लागला, तेव्हा योनाथानने त्याच्या पलीकडे बाण मारला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो आपल्या पोराला म्हणाला, धाव आता मी बाण मारतो त्याचा शोध कर. पोर धावत असता त्याने त्याच्या पलीकडे बाण मारला.