1 Samuel 20:5 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग दावीद म्हणाला, “उद्या अमावस्ये निमित्त मेजवानी आहे. तेव्हा राजाच्या पंक्तीला मी असायला हवे. पण संध्याकाळपर्यंत मी शेतात लपून बसतो
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दावीद योनाथानाला म्हणाला, “हे पाहा, उद्या चंद्रदर्शन आहे व राजाच्या पंक्तीला बसून भोजन करणे मला चुकणार नाही; तर तू मला जाऊ दे, म्हणजे मी परवा संध्याकाळपर्यंत रानात लपून राहीन.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा दावीद म्हणाला, “पाहा उद्या चंद्रदर्शन आहे आणि मला राजाबरोबर चंद्रदर्शनाचे भोजन करावयाचे आहे; पण मला जाऊ दे म्हणजे मी परवाच्या संध्याकाळपर्यंत शेतात लपून राहीन.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दावीद योनाथानाला म्हणाला, “पाहा उद्या चंद्रदर्शन आहे तेव्हा मला राजाबरोबर जेवण्यास बसणे भागच आहे; परंतु मला जाऊ दे परवा संध्याकाळपर्यंत मी रानात लपून राहीन.