1 Samuel 21:6 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
दावीद म्हणाला, “आमचा बायकांशी संपर्क आलेला नाही. युध्दावरच काय पण अगदी सामान्य मोहिमेवर निघाको तरी आमची माणसे शुचिर्भूत असतात. मग या खास कामाबद्दल तर बोलायलाच नको.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा याजकाने त्याला पवित्र भाकर दिली; कारण त्या दिवशी समर्पित ऊन भाकर परमेश्वरासमोर ठेवण्यासाठी जुनी भाकर तेथून काढलेली होती; तिच्याशिवाय तेथे दुसरी भाकर नव्हती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा याजकाने त्याला समर्पित समक्षतेची भाकर दिली, कारण समर्पित भाकरीशिवाय दुसरी भाकर तिथे नव्हती. जेव्हा ताजी भाकरी याहवेहच्या समक्षतेत ठेवली जात असे तेव्हा शिळी भाकर काढून टाकली जात असे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग याजकाने त्यास पवित्र भाकर दिली. कारण ताजी ऊन भाकर ठेवावी म्हणून जी समक्षतेची भाकर परमेश्वराच्या समोरून त्या दिवशी काढलेली होती, तिच्यावाचून दुसरी भाकर तेथे नव्हती.