1 Samuel 22:13 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
शौल अहीमलेखला म्हणाला, “तू आणि इशायचा मुलगा दावीद यांनी माझ्याविरुध्द कट का केलात? दावीदला तू भाकर दिलीस व तलवारही पुरवलीस. त्याच्यासाठी परमेश्वराजवळ प्रार्थना केलीस आणि आता दावीद हल्ला करायला सज्ज आहे.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शौल त्याला म्हणाला, “तू व इशायाचा पुत्र अशा तुम्ही दोघांनी माझ्याविरुद्ध कट केला आहे; तू त्याला भाकर व तलवार दिली आणि त्याच्यासाठी तू देवाकडे प्रश्न केला व त्यामुळे तो आज माझ्याविरुद्ध उठून माझा घात करू पाहत आहे ह्याचे काय कारण?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शौल त्याला म्हणाला, “तू माझ्याविरुद्ध कट का केलास, तू इशायच्या पुत्राला भाकर आणि तलवार देऊन त्याच्यासाठी परमेश्वराकडे चौकशी केली, ज्यामुळे त्याने माझ्याविरुद्ध बंड केले आहे आणि तो आज माझ्यासाठी दबा धरून बसला आहे?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शौल त्यास म्हणाला, “तू आणि इशायाचा मुलगा अशा तुम्ही दोघांनी माझ्यावर फितुरी केली तू त्यास भाकर व तलवार दिली आणि त्याच्यासाठी देवापाशी विचारले यासाठी की, त्याने आजच्यासारखे माझ्यावर उठून माझ्यासाठी टपून बसावे?”