1 Samuel 22:19 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
नोब ही याजकांची नगरी होती. दवेगने तेथील सर्वांना ठार केले. पुरुष बायका, मुले, तान्ही बाळे, इतकेच नव्हे तर गायीगुरे, गाढवे, मेंढरे सुद्धा त्याने तलवारीने कापून काढली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नोबावर तलवार चालवून पुरुष व स्त्रिया, मुले व तान्ही बाळे, बैल, गाढवे व मेंढरे ह्या सर्वांची त्याने कत्तल केली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याने याजकांचे शहर नोब, यातील पुरुष आणि स्त्रिया, लेकरे आणि तान्ही बालके, आणि तेथील गुरे, गाढवे आणि मेंढरे सुद्धा तलवारीने मारून टाकले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याने याजकांचे नोब नगर याचा तलवारीच्या धारेने नाश केला; पुरुष स्त्रिया बालके व तान्ही बाळे, आणि गुरे, आणि गाढवे आणि मेंढरे ही त्याने तलवारीच्या धारेने जिवे मारली.