1 Samuel 23:10 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग दावीदाने प्रार्थना केली, “परमेश्वरा, इस्राएलच्या देवा! कईला येथे येऊन माझ्यामुळे संपूर्ण नगराचा विध्वंस करायचा शौलचा बेत आहे असे मी ऐकले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग दावीद म्हणाला, “हे परमेश्वरा, इस्राएलच्या देवा, शौल माझ्यामुळे कईला नगराचा नाश करण्यासाठी येऊ पाहत आहे, हे वर्तमान तुझ्या दासाने तरी नक्की ऐकले आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दावीद म्हणाला, “याहवेह, इस्राएलच्या परमेश्वरा, शौल माझ्यामुळे या कईलाह नगराचा नाश करण्यास पाहत आहे, असे तुमच्या दासाने नक्की ऐकले आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग दावीद म्हणाला, “हे परमेश्वरा इस्राएलाच्या देवा शौल माझ्यामुळे नगराचा नाश करायला कईल्यावर येऊ पाहत आहे असे तुझ्या सेवकाने खचित ऐकले आहे;