1 Samuel 23:13 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा दावीद आणि त्याच्या बरोबर आलेली सुमारे साहशे माणसे यांनी कईला सोडले. ते गावोगाव भटकंत राहिले, दावीद निसटल्याचे शौलला कळले. त्यामुळे तो तेथे आलाच नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा दावीद व त्याचे सुमारे सहाशे लोक कईलातून निघून वाट फुटेल तिकडे गेले. दावीद कईलाहून निसटून गेला हे शौलाला कोणी सांगितले, तेव्हा त्याने निघण्याचे रहित केले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा दावीद आणि त्याची सुमारे सहाशे माणसे यांनी कईलाह सोडले आणि ते ठिकठिकाणी फिरत राहिले. जेव्हा शौलाला सांगण्यात आले की, दावीद कईलाहतून निसटून गेला आहे, तो तिकडे गेला नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग दावीद व त्याची माणसे उठून कईल्यांतून निघून गेली; ती सुमारे सहाशे माणसे होती. त्यांना जेथे जायला मिळाले तेथे ती गेली; तेव्हा दावीद कईल्यातून पळाला असे शौलाला कोणी सांगितले आणि त्याने तिकडे जायचे सोडले.