1 Samuel 23:14 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
दावीद मग वाळवंटातील गढ्या, किल्ले यांच्या आश्रयाने राहू लागला. झीफच्या वाळवंटातील डोंगराळ भागातही तो राहिला. शौल दावीदाचा माग काढायचा प्रयत्न करत होता. पण परमेश्वराने दावीदला त्याच्या हाती लागू दिले नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग दावीद रानातील गढ्यांमध्ये राहू लागला; तो जीफ नावाच्या रानातील पहाडी प्रदेशात राहिला. शौल त्याचा शोध नित्य करीत असे; पण देवाने त्याला त्याच्या हाती लागू दिले नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दावीद अरण्यातील गडांमध्ये आणि जीफच्या डोंगराळ प्रदेशातील रानामध्ये राहू लागला. दिवसेंदिवस शौल त्याचा शोध घेत होता, परंतु परमेश्वराने दावीदाला त्याच्या हाती दिले नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि दावीद रानातील गडामध्ये राहू लागला. तो जीफ रानात डोंगराळ प्रदेशात राहू लागला. शौल नित्य त्याचा शोध करीत गेला, परंतु परमेश्वराने त्यास त्याच्या हाती दिले नाही.