1 Samuel 23:25 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
शौल आणि त्याची माणसे दावीदचा मागोवा काढत निघाली. पण लोकांनी त्याबद्दल दावीदला सावध केले. तेव्हा तो मावोनच्या वाळवंटातील खडका कडे गेला. शौलला तो मावोनच्या वाळवंटात असल्याचे कळले म्हणून शौल तिकडे गेला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शौल आपले लोक बरोबर घेऊन त्याच्या शोधासाठी गेला; ही बातमी दाविदाला समजली तेव्हा तो खडकाळीतून उतरून मावोनाच्या रानात जाऊन राहिला. हे शौलाला समजले तेव्हा त्याने मावोनाच्या रानात दाविदाचा पाठलाग केला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शौल आणि त्याच्या माणसांनी शोध सुरू केला आणि जेव्हा दावीदाला याबद्दल सांगण्यात आले तेव्हा तो खाली खडकाकडे गेला आणि माओनच्या वाळवंटात राहिला. जेव्हा शौलाने हे ऐकले तेव्हा तो दावीदाचा पाठलाग करीत माओनच्या वाळवंटात गेला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शौल व त्याची माणसे त्याचा शोध करायला आली. हे कोणी दावीदाला सांगितले, म्हणून तो खडकावरून उतरून मावोनाच्या रानात राहिला हे ऐकून शौल मावोनाच्या रानात दावीदाच्या मागे लागला.