1 Samuel 23:26 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
शौल डोंगराच्या एका बाजूला तर दावीद आणि त्याची माणसे त्याच डोंगराच्या दुसऱ्या बाजूला होती. दावीद शौलपासून निसटून जाण्याच्या घाईत होता. शौल आणि त्याचे सैनिक दावीदला पकडण्यासाठी डोंगराला वेढा घालत होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शौल डोंगराच्या ह्या बाजूने चालला आणि दावीद व त्याचे लोक डोंगराच्या त्या बाजूने चालले. शौलाच्या भीतीने दावीद निसटून जाण्याची त्वरा करीत होता, कारण शौल व त्याचे लोक दाविदाला व त्याच्या लोकांना पकडण्यासाठी त्यांना घेरू पाहत होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शौल डोंगराच्या एका बाजूने जात होता तर दावीद आणि त्याची माणसे दुसर्या बाजूला होती, शौलापासून दूर जाण्याची ते घाई करत होते. कारण शौल आणि त्याचे सैनिक दावीद व त्याच्या माणसांना पकडण्यास जवळ येत होते,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शौल डोंगराच्या एका बाजूने चालला आणि दावीद व त्याची माणसे डोंगराच्या दुसऱ्या बाजूने चालली आणि दावीदाने शौलापासून पळायला घाई केली कारण शौल व त्याची माणसे, दावीदाला आणि त्याच्या मनुष्यांना धरायला घेरीत होती.