1 Samuel 23:7 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
दावीद कईला येथे असल्याचे लोकांनी शौलला सांगिते. शौल म्हणाला, “परमेश्वरानेच दावीदला माझ्या हाती दिले आहे. दावीद आता चांगला अडकला आहे. दरवाजे आणि अडसर असलेल्या नगरात तो आता कोंडला गेला आहे.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दावीद कईला येथे गेला हे कोणी शौलाला कळवले तेव्हा तो म्हणाला, “आता देवाने त्याला माझ्या हाती दिले आहे; कारण दरवाजे व अडसर असलेल्या नगरात जाऊन तो आयताच कोंडला गेला आहे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शौलाला कोणी सांगितले की, दावीद कईलाह येथे गेला आहे आणि तो म्हणाला, “परमेश्वराने त्याला माझ्या हाती दिले आहे, कारण ज्या नगरास वेशी व भिंती आहेत त्यात जाऊन दावीदाने स्वतःला कैद करून घेतले आहे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दावीद कईल्याला गेला असे कोणी सांगितले; “तेव्हा शौल म्हणाला, परमेश्वराने तुला माझ्या हाती दिले आहे. कारण वेशीच्या व अडसराच्या नगरात शिरून तो कोंडला गेला आहेस.”