1 Samuel 24:11 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
हा तुकडा पाहा तुमच्या अंगरख्याचा हा तुकडा मी कापून घेतला. मी तुमचा जीव घेऊ शकलो असतो पण मी तसे केले नाही. हे तुम्ही समजून घ्यावे अशी माझी इच्छा आहे. तुमच्याविरुद्ध माझे कसलेही कारस्थान चाललेले नाही हे कृपया घ्यानात घ्या. मी तुमचे काहीही वाकडे केलेले नाही. पण तुम्ही मात्र माझा जीव घेण्यास सारखे टपलेले आहात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शिवाय माझ्या पित्या, पाहा, माझ्या हातात आपल्या झग्याचा काठ आहे, आपल्या झग्याचा काठ मी कापून घेतला, पण आपणाला जिवे मारले नाही, ह्यावरून निश्चये समजा की माझ्या मनात काही दुष्ट हेतू अथवा पातक नाही, आपला अपराध मी केला नाही, पण आपण माझा जीव घ्यायला एकसारखे टपला आहात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पाहा, माझ्या पित्या, तुमच्या झग्याचा तुकडा माझ्या हातात आहे तो पाहा! मी तुमच्या झग्याचा काठ कापून घेतला परंतु तुम्हाला मारून टाकले नाही. यावरून माझ्याकडे दुष्ट किंवा फितुरी असल्याचा दोष नाही. मी तुमच्याशी चुकीचे वागलो नाही, तरीही तुम्ही माझ्या जिवाची शिकार करण्यास टपला आहात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणखी माझ्या बापा, पाहा माझ्या हातात तुमच्या वस्त्राचा काठ आहे तो पाहा. कारण मी तुमच्या वस्त्राचा काठ कापला आणि तुम्हास जिवे मारले नाही. यावरुन माझ्या ठायी दुष्टाई किंवा फितूरी नाही आणि जरी तुम्ही माझा जीव घ्यायला पहाता, तरी मी तुमच्याविरुध्द पाप केले नाही, याची खात्री करून पाहा.