1 Samuel 24:13 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
एक जुनी म्हण आहे, ‘वाईट लोकांपासून वाईटच निपजते.’ माझ्या हातून काहीच वाईट झालेले नाही. मी दुष्ट नाही. मी तुमचा घात करणार नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
प्राचीन काळच्या लोकांची म्हण आहे की दुष्टांपासून दुष्टता उद्भवते, पण माझा हात आपल्यावर पडणार नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जशी प्राचीन काळाची म्हण ‘दुष्टापासून दुष्टाई येते,’ म्हणून माझा हात तुम्हाला स्पर्श करणार नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दुष्टापासून दुष्टाई निघते अशी पुरातन लोकांची म्हण आहे. परंतु माझा हात तुमच्यावर पडणार नाही.