1 Samuel 24:19 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मी तुझा शत्रू नव्हे हे यावरुन दिसतेच. शत्रू आपल्या तावडीत सापडल्यावर त्याला कोणी असे जाऊ देत नाही. शत्रूशी कोणी असे चांगले वागत नाही. आज तू माझ्याशी ज्या चांगुलपणाने वागलास त्याचे तुला देव चांगले फळ देईल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कोणाच्या तावडीत त्याचा शत्रू सापडला तर तो त्याला सहीसलामत जाऊ देईल काय? म्हणून आज तू जे वर्तन माझ्याशी केले आहेस त्याबद्दल परमेश्वर तुझे बरे करो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कोणा मनुष्याला त्याचा शत्रू सापडला तेव्हा त्याला इजा केल्याशिवाय जाऊ देईल काय? ज्याप्रकारे तू आज माझ्याशी वागलास त्याचे चांगले प्रतिफळ याहवेह तुला देवो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कोणा मनुष्यास त्याचा वैरी सापडला तर तो त्यास चांगल्या रीतीने वाटेस लावील काय? तर तू आज जे माझे बरे केले त्याबद्दल परमेश्वर तुला उत्तम प्रतिफळ देवो.