1 Samuel 24:6 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तो आपल्या सोबत्यांना म्हणाला, “माझ्या धन्याच्या विरुद्ध अशी गोष्टी परमेश्वराने माझ्या हातून पुन्हा होऊ देऊ नये. शौल हा परमेश्वराने निवडलेला राजा आहे. त्या अभिषिक्त राजाच्या विरुद्ध मी असे काही करता कामा नये.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो आपल्या लोकांना म्हणाला, “मी आपल्या स्वामीवर, परमेश्वराच्या अभिषिक्तावर, आपला हात टाकावा अशी गोष्ट परमेश्वर माझ्याकडून न घडवो, कारण तो परमेश्वराचा अभिषिक्त आहे;”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तो त्याच्या माणसांना म्हणाला, “मी माझ्या धन्यावर, याहवेहच्या अभिषिक्तावर हात टाकावा अशी गोष्ट याहवेह माझ्या हातून न घडवो; कारण ते याहवेहचे अभिषिक्त आहे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि त्याने आपल्या मनुष्यांस म्हटले, “मी आपल्या धन्यावर परमेश्वराच्या अभिषिक्तावर आपला हात टाकावा अशी गोष्ट परमेश्वराने माझ्याकडून घडू देऊ नये, कारण तो देवाचा अभिषिक्त आहे.”