1 Samuel 25:1 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
शमुवेल मरण पावला. तेव्हा सर्व इस्राएल लोकांनी एकत्र जमून दुखवटा व्यक्त केला. शमुवेलचे दफन त्यांनी रामा येथील त्याच्या घराजवळ केले. नंतर दावीद पारानच्या वाळवंटाकडे गेला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पुढे शमुवेल मृत्यू पावला; तेव्हा सर्व इस्राएल लोकांनी एकत्र जमून शोक केला आणि रामा येथील त्याच्या घरात त्याला मूठमाती दिली. इकडे दावीद निघून पारान नावाच्या अरण्यात गेला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शमुवेल मरण पावले तेव्हा सर्व इस्राएली लोक एकत्र जमले आणि त्यांच्यासाठी शोक केला; आणि त्यांनी त्यांना रामाह येथील त्यांच्या घरी पुरले. नंतर दावीद खाली पारानच्या वाळवंटात गेला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शमुवेल मरण पावला तेव्हा सर्व इस्राएल लोकांनी एकत्र जमून त्याच्यासाठी शोक केला आणि त्यांनी त्यास रामा येथे त्याच्या घरात पुरले. दावीद उठून खाली पारान नावाच्या रानात गेला.